S M L

बच्चन आडनावामुळे काही बंधनं येतात - बिग बी

Sonali Deshpande | Updated On: Feb 5, 2017 05:43 PM IST

बच्चन आडनावामुळे काही बंधनं येतात - बिग बी

05 फेब्रुवारी : अभिषेक बच्चनचा आज (रविवार) वाढदिवस.त्यानिमित्तानं वडील अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर अभिषेकबद्दलच्या भावना शेअर केल्या. बच्चन अाडनावाची  अब्रू जपण्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतात.काही बंधनं येतात.माझ्यावर ती आली होती.अभिषेकवर ती आजही आहेत.

एका सुपरस्टारचा मुलगा म्हणून त्याला कायम जगावं लागलंय, असं त्यांनी लिहिलंय. अभिषेकचा जन्म झाला तेव्हा आम्ही रुग्णालयातच शॅम्पेन फोडली, नर्सेसनाही दिली.असा एक किस्साही त्यांनी सांगितलाय.बघू या बिग बींनी काय लिहिलंय ते -

"बच्चनजींचा मुलगा म्हणून मी जन्म घेतला. आमिताभ बच्चनचा मुलगा म्हणून अभिषेकचा जन्म झाला. सेलिब्रिटी म्हणजे काय हे कळण्याअगोदरच तो सेलिब्रिटी होता. माझे वडील हे प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यामुळे वागण्याबाबत नेहमीच एक अलिखित सक्ती होती. काही सामाजिक, नैतिक आणि सांस्कृतिक नियम पाळावे लागायचे. आडनावासाठी.अभिषेकलाही या सर्वातून जावं लागलं. आजही जावं लागतंय.

अभिषेकचा जन्म झाला तो क्षण मला आजही आठवतो. ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं आणि आमचे फॅमिली डॉक्टर शहांनी विचारलं, काय हवं होतं? मुलगा की मुलगी? त्यांच्या स्मितहास्यावरून मला कळलं की मुलगा झालाय. आम्ही तिथेच शॅम्पेन उघडली. तिथल्या नर्सेसनाही दिली. मला माहीत आहे ते नियमांच्या विरोधात होतं. पण मला खूप आनंद झाला होता. परिवारात आणखी एक सदस्य आल्याचा आनंद.

Loading...
Loading...

आता काही वेळापूर्वी आम्ही चौघांनी बर्फी केक कापला. श्वेता बर्थडे साँग म्हणत होती.आम्ही चौघं - अभिषेक, ऐश्वर्या, श्वेता आणि मी - आम्ही एकमेकांना गिफ्ट्स दिले. ते झोपायला गेले, आणि मी ब्लॉग लिहायला घेतला."

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2017 03:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close