S M L

आज प्रचारसभांचा रविवार

Sonali Deshpande | Updated On: Feb 5, 2017 01:18 PM IST

आज प्रचारसभांचा रविवार

05 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची आज दुसरी प्रचार सभा आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबई महापालिका निवडणुक प्रचारासाठी, भांडुप आणि मुलुंड येथे सभा घेणार आहेत. या दोन्ही सभा भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या मतदार संघात होत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांचा ठाकरी शैलीत, कसा समाचार घेणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

काल गिरगावातील पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना खडे बोल सुनावले होते. आज शिवसेनेवर सडकून टीका करणारे किरीट सोमय्या, यांचा उद्धव ठाकरे कसा समाचार घेतात हे पहावं लागणार आहे.दुसरीकडे आज भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा आज शुभारंभ होतो आहे. हुतात्मा चौकात दुपारी दोन वाजता भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महापालिका प्रचाराचा नारळ फुटेल. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटर इथं मेळावा होणार आहे.या मेळाव्यात पारदर्शी भष्टाचार मुक्त कारभाराची शपथ घेणार आहेत.

गेल्या 20 वर्षांत भाजप मुंबई महापालिका प्रथमच स्वबळावर लढवत आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला मुंबई महापालिकेची सत्ताही मिळवायची आहे. त्यासाठी पक्ष आपली सगळी शक्ती पणाला लावतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2017 01:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close