उल्हासनगरमध्ये भाजपला झटका, ओमी कलानींचा अर्ज बाद

उल्हासनगरमध्ये भाजपला झटका, ओमी कलानींचा अर्ज बाद

  • Share this:

omi kalani04 फेब्रुवारी : उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपला झटका बसलाय.  टीम ओमी कलानीचा प्रमुख ओमी कलानीचा उमेदवारी अर्ज बाद ठरलाय. तीन अपत्य असल्याच्या मुद्द्यावर उमेदवारी अर्ज बाद झालाय.

भाजपने ओमी कलानी टीमसोबत युती केली. त्यातच जागा कमी दिल्यामुळे रिपाइंने भाजपसोबत युती तोडून सेनेसोबत घरोबा केला. टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानीसोबत आखाड्यात उतरून 4 दिवस होत नाही. तेच भाजपला चांगलाच झटका बसला. ओमी कलानीचा उमेदवारी अर्जच बाद ठरवण्यात आलाय. तीन अपत्य असल्याच्या मुद्द्यावर  उमेदवारी अर्ज बाद झालाय. ओमी कलानी हा माजी आमदार पप्पू कलानी आणि विद्यमान आमदार ज्योती कलानी यांचा पुत्र आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2017 07:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading