ट्रम्प यांना झटका, 7 देशांवर घातलेली बंदी न्यायाधीशांनी उठवली

ट्रम्प यांना झटका, 7 देशांवर घातलेली बंदी न्यायाधीशांनी उठवली

  • Share this:

  Trump_GE_28101604 फेब्रुवारी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लीम देशांवर लादलेली प्रवेशबंदी अमेरिकेच्या न्यायाधीशांनी तात्पुरती उठवलीय. सिअॅटलमधल्या न्यायाधीशांनी हा निर्णय दिलाय.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काढलेल्या आदेशावर न्यायाधीश निर्णय देऊ शकत नाहीत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. पण न्यायाधीशांनी हा दावा फेटाळून लावला.

ट्रम्प प्रशासनाला अमेरिकी न्यायसंस्थेला दिलेला हा जोरदार दणका आहे. डॉनल्ड ट्रम्प यांनी सीरिया, इराक, इराण, सोमालिया, सुदान, लिबिया, येमेन या 7 देशांमधल्या नागरिकांना अमेरिकेत यायाला बंदी घातली होती.

या निर्णयामुळे 60 हजार लोकांचा व्हिसा रद्द करण्यात आला होता पण आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा यासबंधी परराष्ट्र मंत्रालय आणि गृहमंत्रालय तज्ज्ञांचा सल्ला घेतंय.

डॉनल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी अमेरिकेच्या विमानतळावर निदर्शनं होत होती. अमेरिकेचा व्हिसा अचानक रद्द झाल्यामुळे प्रवासी खोळंबले होते. पण आता बंदी घातलेल्या देशांतल्या नागरिकांनाही योग्य कागदपत्रांच्या आधारे व्हिसा दिला जातोय.

डॉनल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेत गेला आठवडाभर गोंधळ निर्माण झाला होता. परदेशांतल्या प्रवाशांचेही खूप हाल झाले. आता कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 4, 2017, 6:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading