News18 Lokmat

सर्वाधिक मराठी उमेदवार शिवसेनेत, मनसे दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2017 07:26 PM IST

सर्वाधिक मराठी उमेदवार शिवसेनेत, मनसे दुसऱ्या तर भाजप तिसऱ्या क्रमांकावर

 

04 फेब्रुवारी :   मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं 192 पैकी 120 उमेदवार मराठी दिले आहेत. तर काँग्रेसने 100 उमेदवार महापालिका आखाड्यात उतरवले आहेत. तर मनसेने जाहीर केलेल्या २०३ उमेदवारांच्या यादीत मराठी उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलंय. तर शिवसेनेनं मराठी अजेंडा कायम ठेवत सर्वाधिक 188 उमेदवार दिले आहे.

मुंबई मराठी माणसाची असा नारा देत सर्वच पक्षांनी मराठी उमेदवारांना तिकीट देण्यासाठी प्रयत्न केला. पण, बाजी मारली ती शिवसेनेनं.  सेनेनं २२७ उमेदवार जाहीर केले आहे. यात अमराठी उमेदवार एकूण २१ आहे. गुजराती ७, मुस्लिम ५, उ. भारतीय ४ द. भारतीय ३, ख्रिश्चन १ आणि पंजाबी १ उमेदवार आहे.

मनसेनंही शत प्रतिशत मराठी माणसाला प्राधान्य दिलं. मनसेनं 203 जागांपैकी 186 मराठी उमेदवार दिले आहे. विशेष उत्तरभारतीयांच्या विरोधात राडा करणाऱ्या मनसेनं 7 उत्तर भारतीयांनाही तिकीटं दिलीये. तर भाजपने 192 जागांपैकी 122 मराठी उमेदवार दिले आहे. 25 उत्तर भारतीय आणि 6 मुस्लिम, 18 गुजराथी उमेदवार दिले आहे.

काँग्रेसने फक्त 100 मराठी उमेदवार दिले आहे. आणि 35 उत्तर भारतीय उमेदवार दिले आहे. एमआयएमच्या यादीतही 12 मराठी उमेदवार आहे. भाजप, मनसे आणि काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत कोणाला किती स्थान मिळालंय.

Loading...

 मुंबई महापालिका रणधुमाळी

 मराठी उमेदवार

शिवसेना -188

भाजप - 122

काँग्रेस - 100  

मनसे -  १८६

- उत्तर भारतीय उमेदवार

भाजप - २५

काँग्रेस - ३५

मनसे - ७

शिवसेना - ४

- मुस्लीम उमेदवार

भाजप - ६

काँग्रेस - ३९

मनसे - ४

शिवसेना - 5

- गुजराती उमेदवार

भाजप - १८

काँग्रेस - २२

मनसे- ३

शिवसेना - ७

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2017 06:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...