मुंबई महापालिका निवडणुकीच्या आजपासून धडाडणार प्रचाराच्या तोफा

  • Share this:

shivsena dasara melava

04 फेब्रुवारी :  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज महापालिका निवडणुक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. शिवसेनेच्या महापालिका निवडणुक प्रचाराची पहिली सभा, आज संध्याकाळी गिरगावमध्ये होत आहे. 'लढायचं... भिडायचं... ठासुन जिंकायचंच' अशी आक्रमक ठाकरी शैली या सभेतील होर्डिंगमध्ये वापरण्यात आली आहे.

राज्यातील १० महापालिका निवडणुकीत, उद्धव ठाकरे यांच्या सर्वाधिक १८ सभा मुंबईत होणार आहेत. तर ठाणे, पुणे, नाशिक आणि पिंपरी येथे प्रत्येकी एक सभा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जीव मुंबईत अडकल्याचं स्पष्टं होतंय.

उद्धव ठाकरे यांची शेवटची सभा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार आहे. शिवसेनेत मुंबई आणि ठाण्यात सर्वाधिक बंडखोरी झाली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या बंडोबांना 'थंडोबा' करण्यात शिवसेना यशश्वी ठरतेय का यावर शिवसेनेची रणनिती ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 4, 2017, 10:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading