मराठी कार्यकर्त्यांना उमेदवारीपासून डावलल्याचा संजय निरुपमांवर आरोप

  • Share this:

sanajy_nirupam03 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षात पैसे घेऊन तिकिटं वाटली गेल्याचा आरोप  होत असतानाच आता संजय निरुपम यांनी मराठी कार्यकर्त्यांना उमेदवारीपासून डावलल्याचा आरोपही सुरू झालाय.

मुंबईतल्या विलेपार्लेमधील वॉर्ड क्रमांक ७० मधून पूनम कुबल यांना पहिल्या उमेदवार यादीत स्थान देण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी पक्षानं त्यांना एबी फॉर्म न देता रातोरात एका गुजराती व्यक्तीला तिकीट दिलं. त्यामुळे मराठी माणसावर काँग्रेसमध्ये जाणूनबुजून अन्याय होत असल्याचा आरोप कुबल यांनी केलाय.

कुबल आणि त्यांचे पती सुभाष कुबल हे नारायण राणे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या वादाला राणे विरुद्ध निरुपम अशीही किनार आहे. विलेपार्ल्यात मोठी मराठी वस्ती असूनही हिंदी भाषिक उमेदवार लादले जात असल्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची तक्रार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 3, 2017, 9:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading