S M L

दाभोलकर-पानसरेंच्या हत्येचा तपास न लागणे हे सरकारसाठी लांच्छनास्पद-सबनीस

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2017 09:12 PM IST

दाभोलकर-पानसरेंच्या हत्येचा तपास न लागणे हे सरकारसाठी लांच्छनास्पद-सबनीस

  03 फेब्रुवारी : साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सरकारला साहित्याच्या व्यासपीठावरुम खडेबोल सुनावले. दाभोलकर-पानसरेंच्या हत्येचा तपास लागत नाही हे सरकारसाठी लांच्छनास्पद आहे, असं श्रीपाल सबनीस म्हणाले. साहित्यिकांना पोलिसांच्या सुरक्षेत लिहावं लागू नये,असा टोलाही त्यांनी लगावला.

डोंबिवलीमध्ये 90 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उदघाटन थाटामाटात पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या संमेलनाचं उदघाटन करण्यात आलं. या व्यासपीठावर नवे संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस, साहित्य संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल भालचंद्र जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पु. भा. भावे साहित्यनगरीमध्ये रविवारपर्यंत हे साहित्य संमेलन रंगणार आहे.

श्रीपाल सबनीस यांनी सुनावले खडे बोल


साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सरकारला खडे बोल सुनावले. दाभोलकर-पानसरेंच्या हत्येचा तपास लागत नाही हे सरकारसाठी लांच्छनास्पद आहे, असं श्रीपाल सबनीस म्हणाले. साहित्यिकांना पोलिसांच्या सुरक्षेत लिहावं लागू नये,असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर पवारांचं बोट धरून राजकारण शिकले असतील तर तीच बोटं धरून शरद पवारांनी मोदींकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सही करून घ्यावी, असं आवाहनही केलं. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा अयोग्य आहे, असंही ते म्हणाले.

   साहित्य संमेलनात नेत्यांची भाऊगर्दी  

राजकारणी आणि नेत्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर जाऊ नये, अशी भूमिका आयबीएन लोकमतने घेतली होती. यानंतर राज ठाकरे आणि शरद पवार यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली.  व्यासपीठावर फक्त साहित्यिकांनीच असावं असा संकेत असतो. त्याबद्दल चर्चाही होती. पण संमेलनाच्या व्यासपीठावर नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची भाऊगर्दी दिसली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवींद्र चव्हाण, कपिल  गणपत गायकवाड, राहुल दामले हे सगळे नेते आणि कल्याण डोंबिवलीचे स्थानिक नेतेही व्यासपीठावर दिसले.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 09:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close