संमेलनाच्या व्यासपीठावर भाजप नेत्यांची 'जत्रा'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 08:50 PM IST

संमेलनाच्या व्यासपीठावर भाजप नेत्यांची 'जत्रा'

samelan4303 फेब्रुवारी : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर फक्त साहित्यिकांनीच असावं असा संकेत असतो. त्याबाबत चर्चाही होती. संमेलनात व्यासपीठावर बसण्याचा मान साहित्यिकांचा असतो तिथे नेत्यांनी बसू नये तर श्रोत्यांमध्ये बसावं अशी भूमिका आयबीएन-लोकमनं मांडली होती. मात्र, आज डोंबिवलीत भरलेल्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय नेत्यांनी एकच भाऊगर्दी केली.  व्यासपीठावर नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची जणू जत्राच भरली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्यामुळे भाजपच्या नेत्यांनी व्यासपीठ व्यापून गेले होते.

कोण कोण होतं व्यासपीठावर

व्यासपीठावरील भाजपचे नेते

- 1. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2. रवींद्र चव्हाण, राज्यमंत्री

Loading...

3. कपिल पाटील, खासदार

4. गणपत गायकवाड, भाजप समर्थक आमदार

5. राहुल दामले, नगरसेवक, भाजप

6. वरूण पाटील, गटनेते, भाजप,

शिवसेनेचे नेते

 1. राजेंद्र देवळेकर, महापौर, कडोंमपा

2. राजेश मोरे, सभागृह नेते, कडोंमपा

3. रमेश म्हात्रे, सभापती स्थायी समिती

मनसेचे नेते

- 1. मंदार हळबे, गटनेते, मनसे

2. प्रकाश भोईर,विरोधी पक्षनेता, कडोंमपा

राष्ट्रवादीचे नेते -

1. जगन्नाथ शिंदे, आमदार, राष्ट्रवादी,विधान परिषद.

व्यासपीठावरील वादग्रस्त अधिकारी

- 1. संजय घरत, अतिरिक्त आयुक्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...