मुंबईत भाजपने मित्रपक्षांना जमवलं, ठाण्यात गमवलं

मुंबईत भाजपने मित्रपक्षांना जमवलं, ठाण्यात गमवलं

  • Share this:

BJp and rpi03 फेब्रुवारी : मुंबई महापालिकेसाठी भाजप महायुतीचं अखेर जागावाटप झालंय. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपनं 192 जागांवर उमेदवार उभे केले आहे. आरपीआयला 25 जागा सोडल्यात. तर राष्ट्रीय समाजपक्षाला सहा आणि विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला चार जागा सोडल्या आहेत. मात्र, उल्हासनगरपाठोपाठ आता ठाण्यातही भाजप आरपीआयचा घरोबा संपुष्टात आलाय.

भाजप स्वबळावर मैदानात उतरली खरी पण मित्रपक्षांना सोबत घेताना चांगलीच दमछाक झाली. 227 जागापैकी भाजपने 195 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आणि उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडल्यात. पण, रिपाइंने 40 ते 45 जागा मागितल्यात. आधीच उल्हासनगरमध्ये रिपाइंने भाजपचा साथ सोडून सेनेसोबत घरोबा केल्यामुळे मुंबईत काय होतं याकडे लक्ष्य लागलं होतं. पण, अखेर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही भाजप आणि महायुतीच्या घटकपक्षांच्या जागावाटपाचा घोळ सुरू होता. पण भाजपनं सर्व घटकपक्षांना जागा देऊन त्यांची नाराजी दूर केलीये. भाजप 192 जागेवर लढवणार आहे. तर आरपीआयला 25, रासप 6 आणि शिवसंग्रामला 4 जागा देण्यात आल्या आहेत. मात्र, ठाण्यात सहाच जागा दिल्यामुळे रिपाइंने नाराजी व्यक्त करत काडीमोड घेतलाय.

पाहुयात भाजपच्या ह्या यादीची वैशिष्टये काय ?

भाजपच्या यादीत 117 महिला उमेदवार

32 जागा मित्र पक्षांना, आठवले, जानकरांना

भाजपच्या यादीत सर्वाधिक 93 उमेदवार

मराठी, 29 गुजराती आणि उत्तर भारतीय 25

यादीत भाजप नेत्यांच्या मुलांचा भरणा,

सोमय्यांच्या पत्नीऐवजी मुलाला तिकिट

आशिष शेलारांच्या भावाला तिकिट, विद्या ठाकूर

राज पुरोहित यांच्या मुलाला तिकिट

भाजपच्या यादीत सर्वात कमी जागा, मुस्लिम

आणि सिंधी, प्रत्येकी एक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 3, 2017, 7:52 PM IST

ताज्या बातम्या