युती तुटणार हे 2 महिन्यापूर्वीच डायरीत लिहुन ठेवलं होतं -दानवे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 09:30 PM IST

danve34203 फेब्रुवारी : युती होईलच असं नाही हे 2 महिण्याआधीच माहित होतं आणि ते मी डायरीमध्ये लिहुन ठेवलं होतं असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.

2 महिण्याआधी डायरीत केलेली नोंदही त्यांनी दाखवली.

युती तुटल्यामुळे आम्हाला कुठलाही फटका बसणार नसून आम्ही तयारीतच होतो असंही दानवे म्हणाले. भारतीय जनता पार्टी गाफील नव्हती, राजकारणातले डावपेच आम्ही ओळखून असून डावपेच टाकण्यात आम्ही तरबेज असल्याचं सांगून दानवे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं. पक्ष वाढवण्यासाठी आयात निर्यात करावीच लागते अशी रोखठोक प्रतिक्रियाही दानवेंनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 07:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...