राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे भाजपच्या गळाला ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 07:28 PM IST

राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे भाजपच्या गळाला ?

laxman_dhoble303 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्यामुळे भाजपवर जिल्हाभरातील पक्ष समर्थकांकडून टिकेची झोड उठविली जातेय.

वास्तविक पाहता ढोबळे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, विधानसभेवेळी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून ढोबळे हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना दूर ठेवणे पसंत केले होते. मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ढोबळे यांच्या पत्नीला किंवा पुत्राला उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याचे बोलले जातेय. काही दिवसातच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षप्रवेश दिला जाणार असल्याचे बोलले जातेय. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंत आणि संघ वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...