मोदींनी परवानगी दिली तर ट्रम्प यांना भेटायला जाईल-आठवले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 07:17 PM IST

मोदींनी परवानगी दिली तर ट्रम्प यांना भेटायला जाईल-आठवले

athawale324203 फेब्रुवारी : उल्हासनगरमध्ये आमचे 5 नगरसेवक आहे. पण, तिथे आम्हाला 5 जागा देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला म्हणून आम्ही युती न करण्याचा निर्णय घेतला असं रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं. तसंच मनसेत फक्त राज ठाकरे हे स्ट्राँग आहे पण पक्ष नाही अशी टीकाही आठवले यांनी केली. तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाॅल्ड ट्रॅम्प हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहे आणि मी इकडे रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे त्यांना भेटायला जाईल पण पंतप्रधान मोदींनी तशी परवानगी द्यावी असंही आठवले म्हणाले.

आयबीएन लोकमतच्या न्यूजरुम चर्चा या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी दिलखुलास मुलाखत दिली. कविता, राजकीय टोलेबाजी करत आठवलेंनी रंगत आणली. आज झाली आहे आमची भाजपसोबत युती, पाहुया शिवसेनेची काय होते स्थिती असा टोला आठवलेंनी लगावला. तसंच सत्ता मिळवण्यासाठी युती गरजेची होती म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो. जर आमच्यामुळे त्यांचा फायदा होत असेल तर आम्ही मंत्रिपद का नाही मागावं असा सवालही त्यांनी उपस्थिती केला. बाळासाहेबांपासून राज ठाकरे यांनी वेगळं व्हायला नको होतं. आता ते एकत्र येण्याचा विचार करत आहे. पण,उद्धव ठाकरे तसा निर्णय घेणार नाही असं दिसतंय त्यामुळे राज ठाकरे यांना निवडणुकीला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही असंही राज ठाकरे म्हणाले.  निवडणुकीसाठी हवी तशी तयारी होत नाही. त्यामुळे निवडणुकीत अपयश मिळतंय अशी कबुलीही आठवलेंनी दिली.

गोपीनाथ मुंडे असते तर आज युतीचं वेगळं चित्र वेगळं राहिलं असतं. ते नसल्याची कमी जाणवतेय अशी भावनाही आठवलेंनी व्यक्त केली.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत माझे कोणतेही मदभेद नाही. आता त्यांना माझ्याबद्दल काय वाटतंय त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. पण,  ऐक्य जर होत असले तर मी तयार आहे असंही आठवले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 06:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...