राज ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवारांचीही साहित्य संमेलनाला दांडी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 04:51 PM IST

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ शरद पवारांचीही साहित्य संमेलनाला दांडी

Sharad pawar213

03 फेब्रवारी:  डोंबिवलीत सुरू झालेल्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांही दांडी मारली आहे.

शरद पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्घाटन करणार होते. पण राज्यात काही दिवसांवर महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका होणार आहेत. त्यात आज या निवडणुकांसाठी एबी फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते चांगलेत व्यस्त झालेले दिसतायेत. आणि म्हणून की काय यंदाच्या संमेलानाला राज ठाकरे आणि शरद पवार यांनी दांडी मारली असवी.

दुसर कारण म्हणजे, संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही मोठं राजकारण होत असल्याने, दिग्गज मंडळी त्यापासून लांब राहणंच पसंत करतात. याचा परिपाक म्हणून दुय्यम दर्जाचे साहित्यिकच अशा उत्सवी संमेलनातून स्वतःला मिरवून घेतात. म्हणूनच साहित्य क्षेत्रातलं हे राजकारण कुठेतरी थांबलंच पाहिजे. नाहीतर अशीही कितीही संमेलनं झालीतरी साहित्य क्षेत्राला त्याचा काहीच उपयोग होणार नाही, अशी भूमिका IBN लोकमतनं घेतली. लोकांमध्येही याची चर्चा सुरू आहे. या कारणामुळेही नेते जात नाहीयेत का, याबद्दलच्या चर्चांनाही आता उधाण आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 04:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...