S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

महापौरपदांचे आरक्षण जाहीर, 14 महापालिकांचा कारभार महिलांकडे

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2017 03:55 PM IST

महापौरपदांचे आरक्षण जाहीर, 14 महापालिकांचा कारभार महिलांकडे

03 फेब्रुवारी :  राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी सोडत आज जाहीर करण्यात आली. दरम्यान, 27 पैकी 14 महापालिकांमध्ये महिलांना 'प्रथम नागरिक' होण्याचा मान मिळणार आहे.

मुंबईचं महापौरपद खुल्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे. तर नाशिकचं महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालं आहे.


दरम्यान, नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या महापौरपदी अनुसूचित जातीतील महिला विराजमान होणार असून नवी मुंबईत मागास प्रवर्गाची व्यक्ती महापौरपद भूषवंल.

* अशी आहे महापौरपदाची आरक्षण सोडत

अनुसूचित जमातींसाठी राखीव महापालिका - १

नाशिक

अनुसूचित जातींसाठी राखीव महापालिका - ३

पनवेल - महिला

नांदेड-वाघाळा - महिला

अमरावती

मागास प्रवर्गासाठी (OBC) राखीव महापालिका - ७

मीरा भाईंदर - महिला

जळगाव - महिला

चंद्रपूर - महिला

सांगली-मिरज-कुपवाड - महिला

पिंपरी-चिंचवड

नवी मुंबई

औरंगाबाद

खुल्या प्रवर्गासाठी राखीव महापालिका - १६

ठाणे - महिला

कल्याण-डोंबिवली - महिला

उल्हासनगर - महिला

परभणी - महिला

सोलापूर - महिला

कोल्हापूर - महिला

पुणे - महिला

नागपूर - महिला

मुंबई

लातूर

धुळे

मालेगाव

भिवंडी

अकोला

अहमदनगर

वसई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 03:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close