News18 Lokmat

वोडाफोन-आयडियाचं होतंय विलिनीकरण

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 01:57 PM IST

वोडाफोन-आयडियाचं होतंय विलिनीकरण

03 फेब्रुवारी : गेले काही महिने वोडाफोन आणि आयडिया या दोन मोबाईल कंपन्यांची परस्परांशी चर्चा चालू असल्याच्या बातम्या होत्या पण चर्चेचा विषय काय आहे हे काही केल्या कळत नव्हतं. या एवढ्या मोठ्या गुप्ततेनंतर आत्ता खात्रीलायक बातमी आहे की या दोन्ही कंपन्यांचं विलिनीकरण होणार आहे. असं झालं तर दोन्ही कंपन्या एकत्र होऊन एक नवी कंपनी मोठी कंपनी उभी होईल. नंतर कदाचित ही कंपनी देशातील सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनीही होऊ शकेल.

पहिल्या क्रमांकाच्या उंचीवर पोचताना कंपनी एअरटेल आणि जिओला कशी स्पर्धा करेल, हे पाहणं कौतुकाचं ठरेल. खरंच ते आपल्या स्पर्धकांना पिछाडीवर टाकतात की अजून काही वेगळं होतं, तिकडेच सर्वांचं लक्ष असेल.

वोडाफोन इंडियाने प्रसिध्द केलेल्या पत्रकात असं म्हटलंय की , 'या करारासाठी आम्ही आणि आदित्य बिर्ला ग्रुपचे प्रयत्न चालू आहेत. या विलिनीकरणात इंडस टॉवर्स आणि आयडियामध्ये वोडाफोनची 42 टक्के भागेदारी असेल. या विलिनीकरणामुळे वोडाफोन इंडिया वोडाफोनमधून बाहेर येईल.'

रिलायन्सने आणलेल्या जिओ सिममुळे सगळ्या भारतीय मोबाईल कंपन्यांची कंबरडीच मोडली आहेत. त्यातून सावरण्यासाठी 'एकमेंका साह्य करू' वगैरेचा हा प्रकार असू शकतो. कदाचित जिओच्या स्पर्धेत उभं राहण्यासाठी या कंपन्या तयारी करत असतील. याचं होतंय काय ते येत्या काही महिन्यांत समजेल.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...