S M L

तिकीट वाटपावरून इच्छुकांचा राडा, गडकरी वाड्यासमोर घोषणाबाजी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2017 04:49 PM IST

तिकीट वाटपावरून इच्छुकांचा राडा, गडकरी वाड्यासमोर घोषणाबाजी

03फेब्रुवारी :  पालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस बाकी असतावा अपेक्षेप्रमाणे तिकीटांवरून राडे सुरू झाले आहेत. ठाणे आणि नागपूर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जागावाटपावरून राडा केला आहे.

नागपूरमधल्या भाजपच्या नाराज उमेदवारांच्या समर्थकांचा गडकरी वाड्याबाहेर गोंधळ घातला. महापालिकेचे उमेदवार निश्चितीसाठी सकाळी गडकरी वाड्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व प्रभागांच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुरु असताना वाड्याबाहेर नाराज उमेदवारांनी गोंधळ घातला.


संघमुख्यालय असलेल्या प्रभाग 22 मधून श्रीकांत आगलावे यांना उमेदवारी न दिल्यानं त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच प्रभाग 24 मधून चेतना टांक यांना उमेदवारी न मिळाल्यानं महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. आमच्या उमेदवाराला तिकीट द्या, या मागणीवरून गडकरी वाड्याबाहेर सुरु आहेत.

एकाच वॉर्डामधून अनेक इच्छुक उमेदवार असल्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडतायेत. पैसे घेऊन तिकीट दिलं हा आरोप तर सर्रास होतोय.

तर ठाण्यामध्ये खोपट भागातल्या भाजपच्या कार्यालयात काल रात्रीप्रमाणं आजही राडा झाला. प्रभाग क्रमांक 21 नौपाडा या विभागातून विशाखा कणकोशे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज आहेत. विशाखा यांच्यासह अनेकांच्या तक्रारीनंतर मध्यरात्री भाजप कार्यलयात त्यांच्या समर्थकांनी एकच गदारोळ केला.

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 02:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close