'दबंग 3'मध्ये अॅमी जॅक्सन?

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 12:37 PM IST

'दबंग 3'मध्ये अॅमी जॅक्सन?

salman-khan-7593

०३ फेब्रुवारी :'दबंग ३'मध्ये कोण असेल ही चर्चा आत्ता थांबू शकते कारण त्यात सलमानने अॅमी जॅक्सनला घेतल्याचं समजतंय. सलमानचे इतर चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर असताना या चित्रपटाची चर्चा जास्त आहे. कारण चुलबुल पांडेची हिरॉईन कोण होणार या स्पर्धेत अनेक जणी होत्या, मात्र कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब होत नव्हतं. यात अॅमी सरस ठरली आहे.

अॅमीनं 'एक दिवाना था ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नंतर तिने 'सिंग इज किंग' यात अक्षय कुमारसोबत काम केलंय. अनेक दाक्षिणात्य चित्रपटात ती चमकल्येय. या बातमीची अधिकृत घोषणा अजून केली गेली नाहीये पण अॅमी म्हणाली की, 'सलमानसोबत काम करणं हे माझं स्वप्न आहे. तसं झालं तर मी कधीही त्यासाठी तयार असेन. याआधीही मी किकच्या वेळी त्याच्यासोबत काम करण्याची संधी गमावली होती.'

सोनाक्षी सिन्हा हा चित्रपट नाकारत असल्याच्या बातम्या होत्या. पण तिने तसं काही नसल्याचं म्हटलंय. 'दबंग चित्रपटाने मला बॉलिवूडमध्ये एंट्री दिली म्हणून त्यात काम करायला मी कधीही तयार असेन,' असं स्पष्टीकरण तिनं दिलंय. पण सोनाक्षीचा पत्ता कट होण्याची शक्यताच जास्त आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 08:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...