नाशिकमध्ये पदवीधरसाठी आज मतदान

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 12:26 PM IST

नाशिकमध्ये पदवीधरसाठी आज मतदान

vlcsnap-7087-08-15-21h29m38s855

03 फेब्रुवारी : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज (शुक्रवारी) होत आहे. नाशिक विभागातील 5 जिल्ह्यांतील एकूण 353 मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठीच्या मतदानाची सोय करण्यात आली असून एकूण दोन लाख छप्पन हजार चारशे बहात्तर मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाची ही निवडणूक तिरंगी बनली आहे.

भाजपाच्या वतीने डॉ. प्रशांत पाटील, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे, माकपच्या वतीने राजू देसले यांच्यासह 17 उमेदवारांचे भवितव्य  आज मतपेटीत बंद होणार आहे. पण या ठिकाणी खरी लढत डॉ. प्रशांत पाटील आणि डॉ. सुधीर तांबे यांच्यात होईल. माकपचे राजू देसलेही चांगली लढत देऊ शकतात.

डॉ सुधीर तांबे हे विद्यमान आमदार असून सलग दोन वेळा ते निवडून आलेत. त्यांनी शिक्षक संघटनांची जास्तीत जास्त नोंदणी करून घेतली आहे. एवढचं नाही तर खुद्द माजी मंत्री विखे-थोरात यांनी एकत्र येऊन तांबेंचा ठिकठिकाणी प्रचार केला आहे. तर दुसरीकडे, दुसरी कडे डॉ प्रशांत पाटील हे भाजप कडून निवडणूक रिंगणात आहेत. पाटील यांचे आरोग्य क्षेत्रात चांगले काम असून, स्वच्छ प्रतिमा तसंच केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचे ते जावई आहेत.

तर कम्युनिस्ट पार्टी सुधा पाहिल्यानंदा पदवीधर निवडणुकीत उतरली असून राजू देसले हे उमेदवारी करत आहे. असंघटित कामगारच्या हक्का त्याचे जिल्ह्यात मोठं काम आहे. या सोबत 14 अपक्ष उमेदवार रिंगणात असून 6 फेब्रुवारीला निकाला नंतर कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते हे लवकरच कळणार आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 12:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...