कोल्हापूर मनपाची 17 कोटी 84 लाखांची थकबाकी

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 3, 2017 01:30 PM IST

कोल्हापूर मनपाची 17 कोटी 84 लाखांची थकबाकी

KOLHAPUR PALIKA

03 फेब्रुवारी : राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची धांदल सुरू असतानाच आता कोल्हापूरची महापालिका थकबाकीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय. पाटबंधारे खात्यानं मनपाला याबाबतची एक नोटीस पाठवली असून तब्बल 17 कोटी 84 लाख इतकी ही थकबाकी आहे. अॉक्टोबर 2016पर्यंतची ही थकीत रक्कम आहे.

महापालिकेकडून ही रक्कम भरण्यासाठी आतापर्यंत कोणतेही प्रयत्न केलेले नाहीयत. पाणीपट्टी ही वर्षाला सर्वसाधारणपणे 5 कोटी होते. पण 3 वर्षांमधली ही थकबाकी आहे. ही रक्कम भरली गेली नाही तर महापालिकेचा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी खंडित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांची धांदल जिल्ह्यात सुरू असतानाच आता मनपाचा हा भोॆंगळ कारभार समोर आलाय.

दरम्यान महापालिकेनं ही रक्कम अमान्य केली असून दर आकारणीची माहिती मागवल्यावरचं निर्णय घेऊ असं म्हटलंय. त्यामुळे आता सरकारी लाल फितीत हे प्रकरण अडकणार की त्यातून कोल्हापूरकरांची सुटका होणार याबाबत सध्या कोल्हापूरमध्ये चर्चा सुरुय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 12:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...