S M L

कोंबडा आमचा, सूर्यही आमचाच!, सामनातून भाजपवर टीका

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2017 01:21 PM IST

sena_on_bjp_samana

महापालिका निवडणुका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलाच वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचं प्रशस्तीपत्रक केंद्रीय अर्थ मंत्रालयानंच दिल्यानं तोंडघशी पडलेल्या भाजपवर आज शिवसेनेनं चांगलाच हल्ला चढवला आहे.

'पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपवाल्यांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. कोंबडाही फितूर नाही आणि सूर्यही झाकोळणार नाही. आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय? सत्तेच्या जोरावर नागडे नाचणे याला कुणी पारदर्शकता म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न', अशा बोचऱ्या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'मधून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.त्याच बरोबर, बोबड्या माफियांवर अगंठा चोखत बसयण्याची वेळ आली अशा शब्दात सेनेने किरीट सोमय्या यांचे नाव न घेता भाजपाला चिमटाही काढला आहे.

स्वतः भ्रष्टाचाराच्या पानपट्टीवर बसून दुसऱ्यांवर पिचकाऱ्या टाकणे सोपे असते, पण जेव्हा पारदर्शक सत्य समोर येते तेव्हा आरोप करणाऱ्यांचीच थोबाडे रंगतात. मुंबई महानगरपालिकेवर वाकडी नजर असणारेच हे असले आरोप करू शकतात, अशी चपराकही त्यांनी लगावली आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेना-भाजपमधील वाक् युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 11:19 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close