S M L

महिलांना प्राधान्य देत मुंबईसाठी भाजपाची पहिली अधिकृत यादी जाहीर

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2017 10:25 AM IST

महिलांना प्राधान्य देत मुंबईसाठी भाजपाची पहिली अधिकृत यादी जाहीर

03 फेब्रुवारी : भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची पहिली यादी अखेर जाहीर केली आहे.  जाहीर केलेल्या यादीत 195 जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात 117 मराठी उमेदवारांना संधी देण्यात आली असून महिलांनाही प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तर उर्वरित 32 जागा भाजपाने मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना, मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार यांनी रात्री उशीरा यादी जाहीर केली.


दरम्यान, शिवाजी पार्क परिसरातून भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची बरीच चर्चा होती मात्र त्या निवडणूक लढवणार नाहीत. मेधा यांच्याऐवजी तेजस्विनी जाधव यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपची 195 जणांची अधिकृत यादी जाहीर

भाजपच्या यादीत 117 महिला उमेदवार, 32 जागा मित्र पक्षांना, आठवले, जानकरांना

Loading...

भाजपच्या यादीत सर्वाधिक 93 उमेदवार मराठी, 29 गुजराती आणि उत्तर भारतीय 25

यादीत भाजप नेत्यांच्या मुलांचा भरणा, सोमय्यांच्या पत्नीऐवजी मुलाला तिकिट

आशिष शेलारांच्या भावाला तिकिट, विद्या ठाकूर,  राज पुरोहित यांच्या मुलाला तिकिट

भाजपच्या यादीत सर्वात कमी जागा, मुस्लिमआणि सिंधी, प्रत्येकी एक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 10:09 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close