S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

डोंबिवलीत आजपासून रंगणार साहित्य संमेलन

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2017 10:17 AM IST

90th marathi sahitya samelan

03 फेब्रुवारी :   90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून तीन दिवस डोंबिवलीत रंगणार आहे. सहा परिसंवाद, दोन कविता संमेलन, यासोबतच खास तरुणाईसाठी सहा तास राखून ठेवण्यात आले आहे.

साहित्य सृजकांच्या वार्षिक सोहळ्यात राजकीय लुडबुड नको, असा अक्षय सूर उमटत असतानादेखील डोंबिवलीत भरणाऱ्या ९०व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात राजकीय मांदियाळी जमणार आहे. संमेलनाच्या उद्घाटन समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तर समारोप सत्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हजेरी लावणार आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाला हजेरी लवणार असल्याने या संमेलनाचा एकूण नूरच पालटून गेला आहे.


डोंबिवलीत प्रथमच साहित्य संमेलन होत असून, त्यासाठी पु. भा. भावे साहित्यनगरी सज्ज झाली आहे. शं. ना. नवरे यांच्या नावाने सजलेल्या मुख्य सभामंडपात शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता या संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात हिंदी कवी विष्णू खरे यांच्या हस्ते होईल. त्याआधी सकाळी 10.15 वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रा.चिं. ढेरे ग्रंथग्राम इथे ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन 89 वे संमेलानाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होईल. एकंदर साहित्य संमेलनाच्या मांडवाखाली राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांनाचा वावर दिसणार आहे.

दरम्यान, मावळते संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी असहिष्णुतेचा मुद्दा मांडत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने गतवेळी संमेलनाध्यक्षांचे भाषण चर्चेत आले होते. त्यामुळे नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे हे स्वतंत्र विदर्भ किंवा मराठा आरक्षणाबाबत नेमकी काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवाय, पुण्यात राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचा निषेध करावा, अशी मोहीम डोंबिवलीत सुरू झाल्याने संमेलनात त्याबाबतचा ठराव होणार का? याचीही उत्सुकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 08:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close