मराठी भाषेच्या नावाने दुकानदारी नको, विनोद तावडेंचा ठाकरे बंधूंना टोला

मराठी भाषेच्या नावाने दुकानदारी नको, विनोद तावडेंचा ठाकरे बंधूंना टोला

  • Share this:

vinod_tawade02 फेब्रुवारी :  मराठी भाषेसाठी दुकानदाही हे आम्हाला मान्यच नाहीयेय आम्ही आमचं दुकान चांगलं करतोय समोरच्याचं दुकान बंद होईल असा अप्रत्यक्ष टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ठाकरे बंधूंचं नाव न घेता लगावला.

मराठी भाषेच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या नेत्यांना राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी आयबीएन लोकमतच्या आपलं साहित्य संमेलन या कार्यक्रमात चांगलंच फैलावर घेतलं. डोंबिवलीचं साहित्य संमेलन आणि मनपा निवडणुकांचा संदर्भ घेऊन तावडेंनी ही शाब्दिक फटकेबाजी केली.

तावडे म्हणाले, चित्रपटात अभिनेता हा एकदाच असतो. आम्ही कायम स्वरुपी असतो. मराठी भाषेतील मतदारांसाठी राजकारण सुरू आहे. मराठी भाषा आणि मराठी शाळा यात अंतर आहे. दुकानाची मराठी लागली म्हणजे दुकानदार मराठी असतो असं होतं नाही.

आम्ही दुकानदार आधी मराठी करतोय. त्यामुळे मराठीची दुकानदारी करणाऱ्यांचे ते दुकान हे आम्हाला मान्यच नाहीये आम्ही आमचं दुकान चांगलं करतोय समोरच्याचं दुकान बंद होईल असा टोलाच तावडेंनी ठाकरे बंधूंना नाव न घेता लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2017 10:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading