काँग्रेसमध्ये मुद्यावरुन गुद्यावर !

काँग्रेसमध्ये मुद्यावरुन गुद्यावर !

  • Share this:

congress4विवेक कुलकर्णी, मुंबई

02 फेब्रुवारी : काँग्रेसमधल्या तीव्र गटबाजीचं पुन्हा एकदा दर्शन घडलं. संजय निरुपम यांच्या नेतृत्वाबाबत केवळ नाराजी नाही तर असंतोष खदखदत आहे, हे आजच्या बैठकीत पुन्हा एकदा स्पष्ट झालं. आतापर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असलेली शाब्दिक नाराजी आज हाणामारीपर्यंत पोहोचली.

काँग्रेसचे निरीक्षक भूपेंद्रसिंह हुड्डा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र त्यानंतरही काँग्रेस नेत्यांमध्ये परस्परांबाबद्दल अविश्वास असल्याचेच पाहायला मिळाले. या बैठकीत काँग्रेसचे नेते नारायण राणे, सुरेश शेट्टी, नसीम खान, वर्षा गायकवाड, एकनाथ गायकवाड यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते. काही नेते या बैठकीतून काहीच निष्पन्न होत नाही म्हणून नाराज होऊन बाहेर पडले. उमेदवारी अर्ज भरायला एकच दिवस असतानाही काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही, हे स्पष्ट झालं.

या नाराजीची दखल घेत पक्ष निरीक्षक हुड्डा यांनी उमेदवारी जाहीर झालेल्या व्यक्तींना एबी फॉर्म देऊ नका असा आदेश दिला होता. त्यानंतर काल आणि आज झालेल्या बैठकांमध्ये फारसा तोडगा निघाला नाही, हेच स्पष्ट होतंय. गुरुदास कामत यांनी यापूर्वीच्या बैठकांप्रमाणे या बैठकीवरही बहिष्कार टाकला. हुड्डा यांनी काँग्रेसची यादी अंतिम होईल, हे सांगितले खरं. मात्र 'आॅल इज नाॅट वेल' हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 2, 2017, 9:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading