कुरुप मुलींमुळे हुंडा प्रथा,बारावीचं असंही समाज'शास्त्र'

कुरुप मुलींमुळे हुंडा प्रथा,बारावीचं असंही समाज'शास्त्र'

  • Share this:

banner_dawori03 फेब्रुवारी: पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला हुंडा प्रथेनं काळं फासलंय. मुलीचं कुरुप किंवा अपंग असणं हे हुंड्याचं मोठं कारण असतं, असं धक्कादायक विधान बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात केलंय गेलंय. याच पुस्तकात हुंडा प्रथेविरुद्ध अशीच अनेक आक्षेपार्ह विधानं आहेत आणि ती मुलांना विनादिक्कत शिकवलीही जाताहेत.

डीएनए या वृतपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,  राज्यातल्या शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकात मुलीचं कुरुप किंवा अपंग असणं हे हुंड्याचं मोठं कारण असतं, असं म्हटलं गेलंय. हे धक्कादायक विधान बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात केलं गेलंय. या संदर्भामुळे मुलांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, मात्र त्याचं गांभीर्य कुणालाच नसल्याचं दिसतंय.

'भारताच्या मोठ्या सामाजिक समस्या' या पाठात हे विधान केलं गेलंय. त्यात म्हटलंय की, 'जर एखादी मुलगी कुरुप किंवा अपंग असेल तर तिच्या कुटुंबियांसाठी ती चिंतेची गोष्ट असते. तिच्या लग्नासाठी तिला खूप संकटांना सामोरं जावं लागतं. अश्या मुलीशी लग्न करण्याआधी मुलगा आणि त्याचे कुटुंबीय जास्त हुंड्याची मागणी करतात. ते मागतील तेवढा हुंडा मुलीकडच्यांना गोळा करावा लागतो, द्यावा लागतो. यामुळे समाजातील हुंडा प्रथेला वाव मिळतो.'

खरंतर गेल्या बऱ्याच वर्षांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार तसंच अनेक सामाजिक संस्था या प्रथेविरुद्ध काम करताहेत. तिचा मुळापासून नायनाट करण्याचा प्रयत्न करताहेत. अश्या एनजीओंचं म्हणणं आहे की , 'एखाद्याचं शारिरीक व्यंग किंवा बाह्यसौंदर्य हे त्याच्या स्वभावापेक्षा महत्त्वाचं नसतं, हे येणाऱ्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे.' मात्र या पाठ्यपुस्तकात मिळणारी ही 'शिकवण' पुन्हा हा सामाजिक प्रश्न उभा करते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 08:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading