S M L

जुन्या नोटा भरणारे १८ लाख खातेदार आयकर विभागाच्या रडारवर

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2017 05:49 PM IST

  जुन्या नोटा भरणारे १८ लाख खातेदार आयकर विभागाच्या रडारवर

02 फेब्रुवारी : नोटबंदीदरम्यान जुन्या नोटा खात्यात टाकणाऱ्या 1 कोटी 9 लाख खातेदारांपैकी 18 लाख आयकर विभागाच्या रडारवर आहेत. या 18 लाख खातेदारांची माहिती आयकर विभागाकडील माहितीशी जुळत नसल्यानं या खातेदारांकडून स्पष्टीकरण मागितलं जातंय.

आयकर विभाग राबवत असलेल्या स्वच्छ धन अभियानातंर्गत ठाण्यातील एका कार्यक्रमात प्रधान आयकर आयुक्त एस. कृष्णा यांनी ही माहिती दिली. तसंच मोठ्या प्रमाणात रक्कम भरणा झालेल्या खांत्याची ई-पडताळणीही सुरू असून 10 दिवसात स्त्रोताबाबत स्पष्टीकरण न देणाऱ्यांची चौकशीही केली जाणार असल्याची माहितीही एस.कृष्णा यांनी दिली आहे. तसंच,मोठ्या प्रमाणात रोकड भरणा झालेल्या खात्यांची ई-पडताळणी सुरु असून 10 दिवसात उत्पन्नाच्या स्त्रोतबाबत स्पष्टीकरण न देणाऱ्याची आयटी कलमाखाली चौकशी केली जाणार आहे.

करदात्यांचा अनुपालन खर्च कमी करण्यासाठी आयकर विभागाने ऑनलाईन व्हेरिफिकेशन सुरु केले आहे.त्यानुसार,करदात्यांनी https./incometaxindiaefiling.gov.in या पोर्टलमध्ये लॉग ईन करून आपल्या व्यवहारांची माहिती आणि स्पष्टीकरण नोंदवू शकतात. याशिवाय 1800 4250 0025 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल असं देखील मुख्य आयकर आयुक्त कृष्णा यांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 05:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close