भाजपमध्येही घराणेशाही, सोमय्यांच्या मुलाला आणि शेलारांच्या भावाला उमेदवारी

भाजपमध्येही घराणेशाही, सोमय्यांच्या मुलाला आणि शेलारांच्या भावाला उमेदवारी

  • Share this:

shelar_and_somiya401 फेब्रुवारी : गांधी परिवारावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपनं आपल्या अनेक नेत्यांच्या मुलांना तिकीटं दिलीयेत. मुंबई पालिका निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी पाहिली तर 'हम साथ साथ हैं' या चित्रपटाची आठवण येते. किरीट सोमैयांचा मुलगा, आशिष शेलारांचा भाऊ, विद्या ठाकुरांचा मुगला अशी ही यादी पुढे चालूच राहते.

भाजपनं काल रात्री ७१ जागांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली. यात २८ मराठी नावं आहेत. तर १० उत्तर भारतीय आि ३ गुजराती उमेदवार आहे. मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळेंनाही तिकीट मिळालंय. त्याचबरोबर मुस्लीम आणि सिंधी प्रत्येकी एक एक जागा आहे.  यात आमदार विद्या ठाकूर आणि खासदार किरीट सोमय्या यांच्या मुलांनाही उमेदवारी मिळालीये.  5 विद्यमान नगरसेवकांची नावं तर पक्षात नव्याने आलेले समीर देसाई यांच्याही यात  समावेश आहे.

मुंबईत भाजपचा फॅमिली ड्रामा

- नील सोमैया, किरीट सोमैयांचे सुपुज्त्र

- आकाश पुरोहित, राज पुरोहित यांचा मुलगा

- विनोद शेलार, आशिष शेलारांचा भाऊ

- दीपक ठाकूर, विद्या ठाकुरांचा मुलगा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 03:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading