सेनेत बंडाळी, नाना आंबोले भाजपमध्ये

सेनेत बंडाळी, नाना आंबोले भाजपमध्ये

  • Share this:

nana_ambole02 फेब्रुवारी : स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेत आता बंडोबांनी डोकंवर काढलंय. शिवसेनेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांनी सेनेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपात प्रवेश केलाय.  तिकीट न मिळाल्याने आंबोले भाजपच्या गोटात दाखल झाले. मात्र, नाना आंबोले यांच्या पत्नीला शिवसेनाची उमेदवारी मिळालीये.

"उद्या कुणी जर बंड पुकारण्याचा प्रयत्न केला तर दात तोडेन" असा सज्जड दम उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर अखेर जे व्हायचं ते झालंय. शिवसेनेकडून काल रात्री मुंबईतल्या विभागप्रमुखांकडे एबी फॉर्म सुपूर्द करण्यात आले.

शिवसेनेचे बेस्ट समितीचे अध्यक्ष नाना आंबोले यांना दोन ठिकाणी सेनेकडे उमेदवारी हवी होती. मात्र, सेनेनं त्यांना नकार दिला. सेनेनं आंबोले यांच्या पत्नीना उमेदवार जाहीर केली. पण, एकाच उमेदवाराला दोन ठिकाणी तिकीट देण्यास सेनेनं नकार दिला. त्यामुळे नाराज झालेल्या आंबोले यांनी भाजपचा रस्ता धरला. युती तुटल्यानंतर आंबोले हे पहिले शिवसैनिक ठरले जे भाजपच्या गळाला लागले.  तर दुसरीकडे  गोवंडी शिवसेनेचे नगरसेवक दिनेश पांचाळही भाजपमध्ये दाखल झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 02:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading