S M L

भाजपची यादी जाहीर होण्याआधीच झाली लिक

Samruddha Bhambure | Updated On: Feb 2, 2017 01:51 PM IST

भाजपची यादी जाहीर होण्याआधीच झाली लिक

bjp-pradarshan

02 फेब्रुवारी :  मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने 72 उमेदवारांची आपली पहिली यादी व्हायरल झाली आहे. भाजपच्या नाराज कार्यकर्त्याने उमेदवारी यादी फोडली असून मीडियामधून उमेदवारी यादी प्रसिद्ध झाल्याने भाजपसाठी आता डोकेदुखी वाढली आहे.

पहिल्या यादीत खासदार, आमदार पुत्रांसह ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांनाही यादीत स्थान देण्यात आल्याचं सांगण्यात येतं.


दरम्यान, गांधी परिवारावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपनं आपल्या अनेक नेत्यांच्या मुलांना तिकीटं दिली आहेत. भाजपच्या पहिली यादी पाहिली तर हम साथ साथ हैं या चित्रपटाची आठवण येते. किरीट सोमैयांचा मुलगा, आशिष शेलारांचा भाऊ, विद्या ठाकुरांचा मुगला, अशी ही यादी पुढे चालूच राहते.

भाजपनं काल रात्री 72 जागांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली. यात २८ मराठी नावं आहेत. १० उत्तर भारतीय तर ३ गुजराती उमेदवार आहे. मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळेंनाही तिकीट मिळालं आहे.

IMG-20170202-WA0008 IMG-20170202-WA0006

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 01:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close