S M L

स्वच्छ भारत अभियानामध्ये आता अनुष्का शर्मा

Sonali Deshpande | Updated On: Feb 2, 2017 01:11 PM IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये आता अनुष्का शर्मा

02 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानासोबत अनुष्का शर्माचं नाव आत्ता जोडलं जाणारे. शहरी विकास मंत्रालयानं या अभिनयासाठी तिची निवड केलीय. ती लोकांना स्वच्छतेबद्दल जागरुक करण्याचं काम करणारेय.

जास्तीत जास्त महिला आणि त्यातही ग्रामीण भागातील महिलांमध्ये जागरुकता व्हावी,यासाठी सरकारकडून अनुष्काची निवड करण्यात आल्याचं समजतं. महिलांच्या आरोग्याच्या गोष्टी अनुष्काने त्यांच्यापर्यंत पोचवणं अपेक्षित असेल.

अनुष्का बॉलिवूडमधली टॉपची अभिनेत्री आहे आणि तसंच तिचं फॅन फॉलोईंगही जास्त आहे ,त्यामुळे त्याचा जास्त प्रभाव पडू शकेल. यासंदर्भात तिचा एक व्हिडिओही शूट झाला असल्याचं कळतं. अमिताभ बच्चनही या स्वच्छ भारत योजनेशी जोडलेले आहेत. त्यांच्या ग्रामीण भागातील घरात टॉयलेट असण्याच्या जाहिराती माध्यमांत फिरत आहेत. त्यांच्यासोबत आत्ता अनुष्काही जोडली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 11:15 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close