साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराला अतिरिक्त गृह सचिवही जबाबदार -अण्णा हजारे

साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराला अतिरिक्त गृह सचिवही जबाबदार -अण्णा हजारे

  • Share this:

anna hajare

प्रफुल्ल साळुंखे,02 फेब्रुवारी : राज्य विक्री झालेल्या 47 साखर कारखान्यांच्या विक्रीत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीची प्रत देत अण्णा हजारे यांनी राज्याचे अतिरिक्त गृह सचिव सुधीर श्रीवास्तव यांची भेट घेतली. या संपूर्ण घोटाळ्यात सुधीर श्रीवास्तव यांना जबाबदार धरत त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलंय.

2011मध्ये श्रीवास्तव यांच्या काळात राज्य बँकेच्या प्रशासकीय मंडळात असताना 6 कारखान्यांची विक्री करण्यात आलीय. त्यांनी या कारखान्यांची किंमत जास्त असताना ती कमी दाखवली असा आरोप करण्यात आलाय.हे सर्व पाहता स्वतःचं नाव संशयाच्या भोवऱ्यात असताना  श्रीवास्तव यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतली का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सुधीर श्रीवास्तव यांच्या काळात विक्री झालेले कारखाने कुणी कुणी घेतले ते पाहा -

1) प्रियदर्शिनी स.सा.कारखाना उदगीर

अमित विलासराव देशमुख यांनी विकत घेतला, आता नामकरण विकास स.सा.कारखाना युनिट 2

2) कन्नड स.सा. कारखाना कन्नड

राजेंद्र पवार आणि महेश पवार यांनी विकत घेतला. आता बारामती अॅग्रो ( मुख्यालय सिंगापूर)

3) घृस्नेवर स.सा.कारखाना औरंगाबाद

राष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांनी घेतला, आता उमंग शुगर प्रा. ली.

4)  विजयसिंग राजे दफळे स.सा.कारखाना. जत

जयंत राजाराम पाटील यांनी विकत घेतला, आता कारखान्याचे नाव  राजाराम पाटील स. सा. का. युनिट 3

5) पारनेर .स.सा. कारखाना

विदुरा नवले पाटील यांनी घेतला, आता नावबदल क्रांती शुगर प्रायव्हेट लिमिटेड

अण्णा हजारे यांनी साखर कारखाना घोटाळा प्रकरणी एम.आर.ए पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत दिलेली नावं अशी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , एकनाथ खडसे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंग मोहिते, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, अमित देशमुख, अशोक चव्हाण, जयंत राजाराम पाटील, छगन भुजबळ, फौजिया खान, जयप्रकाश दांडेगावकर, राजन पाटील, पृथ्वीराज देशमुख

आदी बड्या नेत्यावर गुन्हे दाखल करावे याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली आहे, 130 पानी फिर्याद आणि 1700 पानी पुरावे सादर केलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading