मुंबईसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Samruddha Bhambure | Updated On: Feb 2, 2017 12:51 PM IST

matoshri_shivsena

02 फेब्रुवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी काल (बुधवारी) शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 15 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. वाद नसलेल्या जागांवरचे उमेदवारी अर्ज आज भरले जाणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 3 फेब्रुवारी आहे. त्यामुळे दोनच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची लगबग सुरु आहे. या यादी विद्यमान आणि माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. हे सर्व उमेदवार आजच निवडणूक अर्ज भरणार आहेत.

शिवसेनेकडून सुमारे 150 एबी फॉर्मचं वाटप करण्यात आल्याचं समजतं. विभागप्रमुखांशी रात्री उशिरा चर्चा करुन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलं आहे.

दरम्यान, भाजप पाठोपाठ शिवसेनेची देखील पहिली यादी जाहीर झाली आहे. शिवसेनेने भाजपबरोबरची युती तोडली आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे मनेसेने देखील पुढे केलेली हात शिवसेनेने न स्विकारता आपला निर्णय ठाम असल्याचं दर्शवलं.  एकट्याच्या हिम्मतीवर शिवसेना सत्ता पुन्हा काबीज करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी :

प्रभाग क्रमांक 4 :- सुजता पाटेकर

प्रभाग क्रमांक 5 :- संजय घाडी

प्रभाग क्रमांक 7 :- शीतल म्हात्रे

प्रभाग क्रमांक 11 :- रिद्धी खूरसुंगे

प्रभाग क्रमांक 14 :- भरती कदम

प्रभाग क्रमांक18 :- संध्या दोशी

प्रभाग क्रमांक १९१ :- विशाखा राऊत

प्रभाग क्रमांक १९४ :- समाधान सरवणकर

प्रभाग क्रमांक १७९ :- तृष्णा विश्वासराव

प्रभाग क्रमांक १७५ :- मंगेश सातमकर

प्रभाग क्रमांक १९६ :- आशिष चेंबूरकर

प्रभाग क्रमांक १९३ :- हेमांगी वरळीकर

प्रभाग क्रमांक १९९ :- किशोरी पेडणेकर

प्रभाग क्रमांक  १९५ :- स्नेहल आंबेकर

प्रभाग क्रमांक २०३ :- इंदू मसूलकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2017 11:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close