रिलीजआधीच 'बाहुबली 2'नं केली 500कोटींची कमाई

रिलीजआधीच 'बाहुबली 2'नं केली 500कोटींची कमाई

  • Share this:

bahubali 2

02 फेब्रुवारी : 'बाहुबली 2'ची वाट सगळेच पाहतायत. आधीच बाहुबलीचा पहिला सिनेमा सुपरडुपर हिट झाला होता. आता या दुसऱ्या भागानंही रिलीजआधी 500 कोटींची कमाई केली. सिनेमानं रिलीजआधीच थिएटरिकल राइट्स विकले. त्यातून एवढी कमाई झाली.

'बाहुबली 2' तामिळ, तेलगू आणि हिंदीत रिलीज होणारेय. या तीनही भाषांमधल्या वितरकांनी दणकून कमाई केलीय. रिलीजआधी एवढी कमाई करणारा हा पहिला सिनेमा ठरलाय.

सिनेमाचं हिंदी वर्जन 120 कोटी रुपयात,तेलगू वर्जन 130 कोटी रुपयांत, तामिळ वर्जन 47 कोटी रुपयांत विकलं गेलंय. केरळमध्ये 10 कोटींना वितरण अधिकार विकले गेलेत. तर उत्तर अमेरिकेत 45 कोटींना.

बाहुबली 2च्या निर्मात्यांना सिनेमा बाॅक्स आॅफिस गाजवणार याची खात्री आहे. म्हणूनच त्यांनी वितरकांजवळ जास्त रक्कम मागितली आणि त्यांना ती मिळालीही. सिनेमा 28 एप्रिलला रिलीज होणारेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2017 11:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading