भारताने टी-20 मालिका जिंकली,इंग्लंडचा 75 धावांनी उडवला धुव्वा

भारताने टी-20 मालिका जिंकली,इंग्लंडचा 75 धावांनी उडवला धुव्वा

  • Share this:

india_win01 फेब्रुवारी : बंगळुरमध्ये टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 75 रन्सने धुव्वा उडवत टी-20 मालिका खिश्यात घातलीये. युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यापुढे गोऱ्यासाहेबांची दाणादाण उडालीये.

बंगळुरमधील चिन्नास्वामी स्टेडियम टी-20 सामन्यात भारताने पहिली बॅटिंग करत इंग्लंडला 203 धावांचं लक्ष्य दिलं. भारताकडून महेंद्र सिंग धोणी आणि सुरेश रैनाने शानदार खेळी करत भारताचा स्कोअऱ उंचावला. धोणीने 56 तर रैनाने 63 धावा केल्यात. 203 धावाचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंड टीमची खराब सुरुवात झाली.  युजवेंद्र चहलच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या सहा खेळाडूंचा टीकाव लागला नाही. चहलने 25 धावा देत 6 गडी टिपले. 17 व्या ओव्हरमध्ये इंग्लंड संघ 127 धावांवर गारद झाला. या विजयासह भारताने टेस्ट, वनडेच्या नंतर टी-20 मालिकाही खिश्यात घातली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 1, 2017, 11:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading