सेनेकडून उमेदवारांना एबी फाॅर्म वाटप सुरू

  • Share this:

shiva sena 101 फेब्रुवारी : भाजपला मागे टाकत सेनेनं उमेदवारांना एबी फाॅर्म द्यायला सुरुवात केली आहे. मुंबईतल्या वाद नसलेल्या जांगासाठी हे एबी फाॅर्म दिले जात आहे.

कित्येक दिवस सुरू असलेला सेना- भाजप युतीचा वाद संपला तरी इच्छुक उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारा एबी फाॅर्म दिला जात नव्हता. त्यामुळे इच्छुकांच्या काळजाची धडधड वाढली होती. पण अखेर सेनेनं प्रथेप्रमाणे यादी जाहीर न करताच, उमेदवारांना एबी फाॅर्म द्यायला सुरुवात केलीये. आज उशीरापर्यत हे काम चालणार आहे. काही जांगासाठीचे अर्ज मात्र राखून ठेवण्यात येणार आहेत. त्यावर येत्या दोन दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 1, 2017, 10:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading