...तर बजेट हवंच कशाला ?-उद्धव ठाकरे

  • Share this:

Uddhav thackraydlhajhsd 01 फेब्रुवारी :  गेल्या वर्षीचंच बजेट मांडायचं तर बजेट हवंच कशाला, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केलीय. नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या चलनटंचाईमुळे सामान्य माणसाला त्रास झाला. हा त्रास कमी करण्यासाठी बजेटमधून दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्राने केला. पण हा प्रयत्न यशस्वी झाला नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलीय.

उतर प्रदेशातल्या निवडणुकांवरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली. निवडणुका आल्या की भाजपला राम मंदिर आठवतं. त्यावेळी राम मंदिराच्या उभारणीसाठी विटा गोळा करण्यात आल्या होत्या. त्यातलाच काही विटा शोधण्याचा हा प्रयत्न आहे, असा टोला त्यांनी मारलाय.

गोव्याच्या विधानसभेत शिवसेनेने 3 उमेदवारांना रिंगणात उतरवलंय. महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा सुरक्षा मंच यांच्याशी शिवसेनेने युती केलीय. ही युती गोव्याच्या भाषिक अस्मितेसाठी आहे,असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 09:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading