भाजप नको म्हणून हात पुढे केला होता, आता विषय संपला -राज ठाकरे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2017 09:01 PM IST

raj_thackery_banner301 फेब्रुवारी : मराठी माणसासाठी कुणाचेही पाय चाटेल, पण मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पाय छाटेन अशी घणाघाती टीका करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीचा विषय आता माझ्यासाठी संपला असं जाहीर करुन टाकलं. तसंच भाजप नको होती म्हणून हात पुढे केला होता असा खुलासाही राज ठाकरे यांनी केला.

दादर येथील शिवाजी मंदिरात मनसेचा मेळावा पार पडला. शिवसेना-मनसेच्या टाळीवर राज ठाकरे काय बोलता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरे यांनीही भाषणाच्या सुरुवातीलाच मनसेची तयारी जोरात आहे. आज खूप बोलायचंय. खूप विषय आहेत पण आजच सर्व पोतडीतून बाहेर काढणार नाही असं म्हणत त्यांनी युतीच्या मुद्दाला हात घातला युतीसाठी माझा विचार ठाम होता. युतीचा संपूर्ण विचार केला होता तो मी एका बाजूने केला होता. मातोश्रीवर त्यासाठी मी सात वेळा फोन केले पण उचलले नाही. मराठी माणसासाठी कुणाचेही पाय चाटेल, पण मुंबई वेगळी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पाय छाटेन. भाजप नको म्हणून हात पुढे केला होता असं स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी दिलं.

'भाजपला महापौर बंगला हवाय'

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे दोघेही भांडले आणि पुन्हा एकत्र आले. उलट माझ्यावर आरोप करताय राज ठाकरे यांना बाळासाहेबांचं स्मारक नकोय ?, पण बाळासाहेबांचं स्मारकाशी यांनाच काही घेणं देणं नाही. भाजपला फक्त महापौर बंगल्याची जागा हवीये. शिवसेना यांना दुखवत नाही म्हणून ही सगळी खेळी आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला.

बुलेट ट्रेन कशाला ?

Loading...

बुलेट ट्रेन कशासाठी हवीये ? ती फक्त गुजरात्यांसाठी हवीये. गुजरातमध्ये सहा स्टेशन आणि मुंबई 3 स्टेशन. हे आम्हाला कळत नाही का?, जास्तीत जास्त लोक संख्या वाढवून आपआपले मतदार संघ तयार केले जात आहे अशी टीकाही राज ठाकरेंनी केली.

'भाजपचा मुंबई तोडायचा डाव'

मराठी मतांचं मतविभाजन केलं जातंय अशी ओरड सुरू आहे. पण, आधी विदर्भ तोडायचा आणि नंतर मुंबई तोडायची असा भाजपचा डाव आहे. भाजपचा पर्यायी शब्द शोधला तर तो थापा आहे. नरेंद्र मोदी यांचं नाव जर गुगलवर सर्च केलं तर फेकू येतं अशी आपल्या पंतप्रधानांची प्रतिमा तयार झालीये असंही राज ठाकरे म्हणाले. तसंच शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करताय पण 25 वर्ष तुम्हीही सोबत होता, फावडं तुम्हीही उचललं. यांच्या थापाना बळी पडू नका असंही राज ठाकरे म्हणाले.

सुरेश प्रभूंची उडवली खिल्ली

दिल्लीमध्ये मराठी तरुणांना मारहाण होते आणि आपल्याकडे नेते काहीच करत नाही. त्या जागी जर बिहार, उत्तरप्रदेश असता तर तिकडच्या नेत्यांनी रणकंदन घडवलं असतं. आपले ते  सुरेश प्रभू रेल्वे मंत्री यांना पाहिलं की हातात तंबाखू देऊ वाटते, सारखं हात चोळत असतात अशी खिल्लीही राज ठाकरेंनी उधळली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 09:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...