आता तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार ?

आता तुम्हाला किती टॅक्स भरावा लागणार ?

  • Share this:

income_tax

01 फेब्रुवारी : केंद्र सरकारच्या बजेटमध्ये करदात्यांना दिलासा दिलाय. वार्षिक 3 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये सवलत देण्यात आलीय. तर 3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांनाही करामध्ये जादा सवलत देण्यात आलीय. त्यांच्यासाठी 2.5 लाखांपासून ते 5 लाख रुपये उत्पन्नावर 5 टक्के कर लावण्यात आलाय. याआधी हा कर 10 टक्के होता. त्यामुळे आता तुम्हाला किती टक्के कर द्यावा लागेल असा प्रश्न तुमच्या मनात पडलाय. असाले तर...

समजा तुमचं आर्थिक उत्पन्न हे 3 लाख असेल तर तुम्हाला आता 2575 कर द्यावा लागणार आहे. मागील वर्षी हाच कर तुम्हाला 5150 रुपये कर द्यावा लागत होता.

समजा तुमचं आर्थिक उत्पन्न हे 3.5 लाख असेल तर तुम्हाला आता 5150 कर द्यावा लागणार आहे. मागील वर्षी हाच कर तुम्हाला 10300.00 रुपये कर द्यावा लागत होता.

तुमचं उत्पन हे 4 लाख असेल तर आता तुम्हाला 7725 कर लागेल पूर्वी तो 15450 कर द्यावा लागत होता.

तुमचं उत्पन हे 4.5 लाख असेल तर आता तुम्हाला 10300 कर लागेल पूर्वी तो 20600 कर द्यावा लागत होता.

तुमचं उत्पन हे 5 लाख असेल तर आता तुम्हाला 12875 कर लागेल पूर्वी तो 15450 कर द्यावा लागत होता.

(तुमच्या उत्पन्नावर किती कर लागेल हे जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा)

दरम्यान, 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर 10 टक्के कर असेल.  मागच्या आर्थिक वर्षात नोटबंदीमुळे जादा टॅक्सवसुली झाली. 3 कोटी 70 लाख लोकांनी टॅक्स रिटर्न भरले.

देशभरात 76 लाख लोकांनी 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई दाखवलीय पण परदेशात जाऊन आलेल्या लोकांची संख्या मात्र 2 कोटी होती, अशी आकडेवारी आहे.

केंद्राचं 'करलेस' बजेट

टॅक्स भरणाऱ्यांना थोडा दिलासा

3 लाख रुपये उत्पन्नावर कोणताही कर नाही.  

3 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांसाठीही करामध्ये सवलत

2.5 लाख ते 5 लाख रुपये उत्पन्नावर 5 % कर

50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर 10 % कर

50 कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना करात 5 टक्के सूट

मागच्या आर्थिक वर्षात नोटबंदीमुळे झाली जादा टॅक्सवसुली

3 कोटी 70 लाख लोकांनी भरला टॅक्स रिटर्न

देशभरात 76 लाख लोकांनी 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई दाखवलीय.

पण परदेशात जाऊन आलेल्या लोकांची संख्या मात्र 2 कोटी होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 06:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading