जेटलीचं रेल्वे बजेटही सुसाट,आॅनलाईन तिकीट बुकिंगवर सेवाकर नाही

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2017 05:19 PM IST

जेटलीचं रेल्वे बजेटही सुसाट,आॅनलाईन तिकीट बुकिंगवर सेवाकर नाही

rail_budget401 फेब्रुवारी : २०१७-१८ चं बजेट रेल्वेच्या दृष्टीनं ऐतिहासिक म्हणावं लागेल कारण अरुण जेटली हे पहिले अर्थमंत्री ठरलेत ज्यांनी रेल्वे बजेटही मांडलंय. कोणतेही भाडेवाढ न करता सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. आॅनलाईन तिकीट बुकिंगवर सेवाकर माफ करण्यात आलाय. तर पर्यटन आणि तिर्थक्षेत्रांसाठी  विशेष ट्रेन्सवर भर देण्यात आलाय. तसंच सुरक्षेसाठी पुढच्या पाच वर्षांसाठी १ लाख ३१ हजार कोटींची तरतूदही बजेटमध्ये करण्यात आलीये.

यावर्षी पहिल्यांदा केंद्राचं बजेट आणि रेल्वेचं बजेट एकत्र मांडण्यात आलं. त्यामुळे पायाभूत सुविधांसोबतच रेल्वेसाठी तरतूद करण्यात आलीय. या बजेटमध्ये स्मार्ट सिटी मिशनवरही भर देण्यात आलाय. याबदद्लचा एक रिपोर्ट बघुया.

केंद्राचं बजेट आणि रेल्वे बजेट यावेळी एकत्र मांडण्यात आलं. त्यामुळे नव्या रेल्वेमार्गांच्या घोषणांपेक्षा रेल्वेसाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्यायत. रेल्वे सुरेक्षेसाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. 7 हजार रेल्वे स्टेशन सौरऊर्जायुक्त करण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाचे शेअर मार्केटमध्ये आणण्यात येणार आहेत.

2017-18 मध्ये 3500 किमीचे रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहेत. मेट्रो रेल्वेसाठी नवं धोरण असल्यामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. 500 रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवणार आहे. त्यासोबतच 25 नवी रेल्वे स्थानकं बांधण्यात येणार आहेत.

या बजेटमध्ये पायाभूत सुविधांसाठी सर्वाधिक म्हणजे 3 लाख 96 हजार 135 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. त्यासोबतच 2 हजार किलोमीटर सागरी मार्गांचा विकास करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्ण देशात संरचनात्मक काम उभारण्यासाठी या बजेटमध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्यायत.

Loading...

रेल्वे बजेटमध्ये काय ?

आयआरसीटीसी अंतर्गत बुक करण्यात येणाऱ्या तिकीटांवर सर्विस चार्ज लावला जाणार नाही.

२०१९ पर्यंत रेल्वेच्या सगळ्या डब्यांमध्ये बायो टॉयलेट बसवण्यात येतील

पर्यटन आणि तिर्थक्षेत्रांसाठी  विशेष ट्रेन्स असतील

नवं ३५०० कीमीचं रेल्वेचं जाळं तयार केलं जाईल

५०० स्टेशन्स हे दिव्यांगांसाठी वापरण्याजोग करण्यात येईल

२५ स्टेशन्सचा पुनर्विकास करण्यात येईल

7000 स्टेशन्सवर सौरउर्जेचा वापर सुरु करण्यात येईल

नविन मेट्रो रेल पॉलिसी अवलंबात आणली जाईल ज्यामुळे युवकांना नोकरीची संधी उपलब्ध होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 02:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...