S M L

भाजप नेत्यांचा बोलाची कढी आणि बोलाचाच भात -अजित पवार

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2017 10:56 PM IST

ajit_pawar3431 जानेवारी : सत्ता मिळाल्यानं भाजप नेते काय बोलताय आणि काय नाही याचं त्यांनाच भान नाहीये. भाजपचे नेते सत्तेमुले बावचाळून गेल्याचं जळजळीत टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलीये. तसंच नितीन गडकरी म्हणतात अकरा लाख कोटींचे रस्ते बांधले ते रस्ते कुठं आहेत असा सवालही त्यांनी केला.

पुण्यातल्या  शिरूर तालुक्यातील न्हावरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक उमेदवाराची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय  शेतकऱ्यांच्या कोणत्याचं शेत मालाला बाजार भाव नाही,  शेतकरी देशोधडीला लागला आहे अशा शब्दात अजित पवार राज्यातील आणि केंद्रातील भाजपा सरकारवर बरसले. भाजप सरकार हा गुंडांचा पक्ष असून मुख्यमंत्री हे गुंडाच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. तसंच मुख्यमंत्री आपल्याच मित्र पक्षाशी औकात काढत आहेत अशी टीकाही अजित पवारांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 10:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close