उल्हासनगरमध्ये भाजप-आरपीआय युती तुटली,सेनेसोबत घरोबा

उल्हासनगरमध्ये भाजप-आरपीआय युती तुटली,सेनेसोबत घरोबा

  • Share this:

athawale_uddhav_cm31 जानेवारी : भाजपसोबत आरपीआयची युती जाहीर झालेली असली तरी उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय युती तुटलीये. आरपीआयने शिवसेनेशी घरोबा केलाय. मित्रांना सोबत घेऊन लढणार असल्याचं सांगणाऱ्या भाजपला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का बसलाय.

दोन दिवसांपूर्वी  उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्ष , आरपीआय (आठवले ) आणि टीम ओमी कलानी यांच्या युतीची जाहीर घोषणा करण्यात आली होती. मात्र, टीम ओमी कलानीने रिपब्लिकच्या बाले किल्ल्यातील जागावर आपला अधिकार सांगितला आणि भाजपने तो मान्य केल्याने शेवटी आरपीआयने भाजपशी सोडचिट्ठी घेतली  आणि शिवसेने सोबत नवा घरोबा केला. आज शिवसेनेचे नेते गोपाळ, खासदार श्रीकांत शिंदे आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, मामा गायकवाड, नाणं पवार आणि बीबी मोरे यांनी शिवसेना आरपीआयच्या युतीची घोषणा केली.

उल्हासनगर मध्ये रिपब्लिकन पक्षाची बऱ्या पैकी ताकत आहे. त्यामुळे भाजपाने आरपीआयसोबत युतीची बोलणी करून १४ जागा देण्याचे मान्य केले होते आणि तशी घोषणा सुद्धा करण्यात आली होती. मात्र, त्याच वेळी उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळे होऊन उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानी आणि विद्यमान आमदार ज्योती कलानी यांचा मुलगा हा टीम ओमी कलानी हे नाव धारण करून गेली १ वर्ष राजकीय क्षेत्रात प्रामुख्याने सिंधी बहुल विभागात आपले वर्चस्व स्थापित करण्यात यशस्वी झाला होता. सिंधी परिसरात त्याचे असणारा प्रभाव पाहता सिंधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजपाने दोन दिवसांपूर्वी टीम ओमी कलानी सोबत आपली युती जाहीर केली. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि ओमी कलानी  यांनी या युतीची घोषणा केली

मात्र गेली दोन दिवस टीम ओमी कलानी सोबत जागावाटपा संदर्भात जी बोलणी सुरू होती. त्या बोलणीच्या वेळी ओमी कलानी यांनी आरपीआय साठी जया १४ जागा सोडल्या होत्या त्या १४ जागावर दावा ठोकला. त्यापैकी ७ जागा भाजप आरपीआयकडून काढून टीम ओमी कलानीच्या पदरात टाकणार आहे असा निरोप भाजपने आरपीआयला दिला. त्यामुळे आरपीआयचे स्थानिक नेते हडबडले, त्यांनी तातडीने भाजप नेत्यांना गाठले मात्र भाजपने आपला शब्द फिरवला आणि १४ ऐवजी ७चं जागा घ्या आम्ही रामदास आठवले सोबत बोलू असं सांगितल्यानं स्थानिक नेत्यांनी भाजप सोबत सोडचिट्ठी घेतली आणि सेने सोबत १३ जागा घेऊन नवा घरोबा केला.

ओमी कलानी आणि भाजपाची युती ही शिवसेनेच्या पथ्यावर पडली असून आरपीआय सेनेसोबत युतीमुळे शिवसेना जी शहरात एकटी पडत चालली होती. तिला मोठा आधार मिळाला असून मराठी विभागात जिथे शिवसेना आणि आरपीआयच्या मतांची विभागणी होणार होती ती आता टळणार आहे. यामुळे भाजपाची मात्र अडचण झाली असून टीम ओमी कलानी आणि भाजप ही सिंधी बहुल इलाक्या पूर्ती मर्यादीत होत असल्याचे चित्र तयार होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 31, 2017, 10:29 PM IST

ताज्या बातम्या