S M L

भाजपच्या उमेदवारांची यादी तयार -आशिष शेलार

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2017 09:59 PM IST

ashish_shelar31 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी तयार झाल्याची माहिती मुंबईचे भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलीये.

मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघातील उमेदवारांची यादी तयार झालीये. एक मतदारसंघातली यादी आज अंतिम यादी होईल असंही त्यांनी सांगितलं. तर आरपीआय रासप आणि शिवसंग्राम पक्षालाही निवडणुकीत जागा सोडल्याचं शेलार यांनी सांगितलं. बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उमेदवार यादी जाहीर न करता उमेदवारांना थेट एबी फाॅर्म देणार असल्याची अशी चर्चा रंगली होती त्या चर्चेला आशिष शेलार यांनी पूर्णविराम दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 09:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close