31 जानेवारी : मनसेनं निवडणुकीत शिवसेनेसमोर उमेदवार देऊ नये असं शिवसेनेचे पीआरओ हर्षल प्रधान यांनी सोशल मीडियावर टाकलेला संदेश हा वैयक्तिक असल्याचं स्पष्टीकरण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिलंय. शिवसेनेची अधिकृत भूमिका ही शिवसेनेच्या अधिकृत साईटवर टाकण्यात येते. किंवा स्वतः आपण बोलतो असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
एकीकडे शिवसेना आणि मनसेच्या युतीची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रस्ताव नाकारला असला तरी शिवसैनिकांकडून प्रयत्न सुरू असल्याचं समोर आलंय. सेनेचे पीआरओ हर्षल प्रधान यांनी व्हाॅटस्अॅपवर मॅसेज पोस्ट केला होता. यात त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्यावर मनसेला शिवसेनेशी युती करायची असेल तर त्यांनी शिवसेनेसमोर उमेदवार देऊ नयेत असं हर्षल प्रधान यांनी म्हटलं होतं. याबद्दल उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
असं कोणतंही आवाहन शिवसेनेनं केलं नाही. ती पक्षाच्या अधिकृत साईट वर टाकलेली पोस्ट नाही. शिवसेना मध्यवर्ती कार्यालायातून ज्या पोस्ट टाकल्या जातात, त्याच शिवसेनेच्या अधिकृत पोस्ट असतात अशी माहिती उध्दव ठाकरे यांनी दिली. तसंच त्यांची पोस्ट ही त्यांचं वैयक्तिक मत असल्याचंही उद्धव यांनी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा