S M L

ओमी कलानी विरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Sachin Salve | Updated On: Jan 31, 2017 10:14 PM IST

ओमी कलानी विरोधात शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

31 जानेवारी : भर सभेत तलवार घेऊन मिरवणाऱ्या प्रकरणी भाजपसोबत युती करणारे ओमी कलानींविरोधात शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीये.

निवडणूक आयोगाच्या वतीने आदर्श आचारसंहिता घोषित केली असून त्याच धर्तीवर महापालिकेच्या निवडणुका निर्भयपणे तसेच कायदा सुवेवस्थेला कुठेही गालबोट लागता कामा नये यासाठी ठाणे  पोलीस आयुक्तांनी परवाना धारक शास्त्र बाळगणाऱ्याना विविध शास्त्र पोलिसाकडे जमा करावी असे आदेश सर्वच पोलीस ठाण्याला देण्यात आले. मात्र 28 जानेवारी गोल मैदानच्या सभेत भाजपसोबत युती करणारे ओमी कलानी आणि आरपीआय च्या युतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी भरसभेत ओमी कलानी हे कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून हातात भली मोठी तलवार घेऊन सभेच्या ठिकाणी आगमन केल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असताना सुद्धा ओमी कलानी यांनी हातात तलवार घेऊन आगमन केल्याने उल्हासनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पाहवयास मिळालं आहे.


या घटनेचा निषेध करीत शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून ओमी कलानी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.  तसंच याबद्दल तक्रार आल्यास सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाई करणार असं मत आयुक्त आणि निवडणूक अधिकारी निंबाळकर यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 09:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close