औरंगाबादेत आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक

औरंगाबादेत आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक

  • Share this:

 chaka_jaam4

31 जानेवारी : मराठा क्रांती मोर्चाकडून आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येतंय. औरंगाबादमध्ये मात्र आंदोलनाला हिंसक वळण लागलं.  आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडालीय. तसंच आंदोलकांनी दगडफेकही केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

औरंगाबादमध्ये मराठा संघटनांनी रास्ता रोको केला होता. वाळूज परिसरातील ओएसिस चौकात हे आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेकही केली. दरम्यान अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

कोल्हापुरात 30 ठिकाणी आंदोलनं

तर कोल्हापुरातल्या 30 ठिकाणी मराठा संघटनांनी आंदोलनं केली. कोल्हापुरातल्या राष्ट्रीय महामार्गावर हे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनामुळे कागल-सातारा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तर पुणे -बंगळुरू महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

'मुंबईमध्ये ईस्टर्न एक्स्प्रेस वे जाम'

दादरमध्ये चित्रा टॉकीजजवळ चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. ठाण्यातील आनंद नगर चेक नाक्यावरही चक्काजाम करण्यात आला. 'एक मराठा, लाख मराठा 'अशी घोषणाबाजी  करत आंदोलकांनी काही ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर चक्का जाम केला. या आंदोलनामुळे मुंबई-ठाणे वाहतूक काही वेळ खोंळबली होती. दरम्यान, पोलिसांनी चक्का जाम करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं.

पनवेलमध्ये चक्का जाम

पनवेलमधील कामोठ्यातही मराठा संघटनेकडून चक्का जाम केला. सायन-पनवेल महामार्गावर हे आंदोलन करण्यात आलं होतं. त्यामुळे इंथही मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम करण्यात आलं होतं. सरकारनं  मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा राज्यभरातून उग्र आंदोलन केलं जाईल  अशा इशारा आंदोलकांनी दिला.

नाशिककरांचा इशारा

नाशिकमध्येही मराठा समाज चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलाय. मराठा आऱक्षणाबाबत सरकार सकारात्मक नसल्याची खंत यावेळी तरुणांनी व्यक्त केली.  सरकारने जर आमची आंदोलनं गांभिर्याने घेतली नाही तर याची किंमत सरकारला भोगावी लागेल असा इशारा आंदोलकांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 31, 2017, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading