S M L

कोल्हापूरमध्ये चक्काजाम आंदोलन शांततेत

Sonali Deshpande | Updated On: Jan 31, 2017 02:08 PM IST

कोल्हापूरमध्ये चक्काजाम आंदोलन शांततेत

kolhapur chakkajam

31 जानेवारी : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज सकल मराठा समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा यासह अनेक मागण्या घेऊन आज मराठा समाजानं हे आंदोलन केलं.

कोल्हापूर जिल्ह्यात 30 ठिकाणी आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रीय महामार्गावरही 3 ठिकाणी आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते. गोकुळ शिरगावजवळ आंदोलनकर्त्यांनी 1 तास महामार्ग अडवला होता. त्यामुळं बेळगावहून पुण्याकडे आणि पुण्याहून बेळगावकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली.शहरातल्या दसरा चौकातही मराठा समाजाच्या वतीनं चक्काजाम आणि ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यामध्ये महापौर हसिना फरास यांच्यासह लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते. कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, चंदगड, गडहिंग्लज, पेठवडगावमध्येही आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान आजचं आंदोलन हे संपूर्ण जिल्ह्यात शांततेत पार पडलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 02:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close