S M L

मराठा आरक्षणाची सुनावणी 27 फेब्रुवारीला

Sonali Deshpande | Updated On: Jan 31, 2017 01:59 PM IST

M_Id_404282_mumbai_high_court

31 जानेवारी : मराठा आरक्षणाची सुनावणी आता २७ फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टात होणार आहे. याचिकाकर्त्यांनी आणि सरकारनं सतत प्रतिज्ञापत्र सादर करु नये, त्यामुळे सुनावणी सतत पुढे जाईल असं हायकोर्टानं व्यक्त केलं आहे.

राज्य सरकारने केलेल्या जवळपास अडीच हजार पानांच्या प्रतिज्ञापत्राच्या उत्तरादाखल प्रतिवादींनी आणि विरोधक याचिकादारांनी सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यामुळे 'आता आणखी प्रतिज्ञापत्रे करत राहून वेळ घालवू नका, अन्यथा विषय लांबत राहील', असं म्हणत अंतिम सुनावणी सुरू करण्यासाठी मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने २७ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली.'ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ, या राज्य सरकारच्या पूर्वीच्या भूमिकेत बदल झाला आहे. पूर्वी स्वतंत्र प्रवर्ग करत त्यांना आरक्षण देण्याचा कायदा राज्य सरकारने केला होता. पण तो हायकोर्टाने नाकारल्यानंतर आता नव्याने केलेल्या प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने भूमिकेत बदल केला आहे.मराठ्यांचं मूळ एकच नाही, वेगवेगळे आहेत, असं म्हणत त्यांना इतर मागासवर्गीय प्रवर्गातच (ओबीसी) आरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे', असा आरोप काही विरोधक याचिकादारांतर्फे आज करण्यात आला. पण हे सर्व मुद्दे युक्तिवादाच्या वेळी मांडा, असं हायकोर्टाने सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 31, 2017 01:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close