अमेरिकेत एच1बी व्हिसामध्ये बदल,आयटी कंपन्यांना फटका

Sonali Deshpande | Updated On: Jan 31, 2017 04:11 PM IST

अमेरिकेत एच1बी व्हिसामध्ये बदल,आयटी कंपन्यांना फटका

31 जानेवारी : सात देशातल्या नागरिकांना अमेरिकेत यायची बंदी घातल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय आयटी कंपन्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी शॉक दिलाय. कारण एच 1 बी व्हिसावर बंधनं घालणारं विधेयक अमेरिकेत मांडण्यात आलंय. तसा अध्यादेश जारी करण्यात आलाय.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयानं भारतीय आयटी कंपन्या तसंच त्यातल्या कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. एच 1 बी ह्या व्हीजाचा वापर मुख्यत: भारतीय आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना अमेरिकेत पाठवण्यासाठी केला जातो. एच वन बी व्हीजा मिळालेल्या व्यक्तीच्या जोडीदारालाही अमेरिकेत नोकरी करता येणार नाही.

दरवर्षी अमेरिका जवळपास 85 हजार भारतीयांना हा व्हिसा देते.गेल्या वर्षी जवळपास 86 टक्के H1B व्हिसा भारतीयांना देण्यात आला.अमेरिकेत अभ्यासासाठी गेलेल्या 20 हजार भारतीय विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसू शकतो.

अमेरिकेत जवळपास 40 लाख भारतीय आहेत. डोनाल्ड ट्रम्पच्या या निर्णयानं नाराजीचे सूर उमटू लागलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2017 01:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close