मराठा क्रांती मोर्चाचं राज्यभर चक्का जाम आंदोलन,ठाण्यात 100हून कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मराठा क्रांती मोर्चाचं राज्यभर चक्का जाम आंदोलन,ठाण्यात 100हून कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

  • Share this:

CHAKKAJAM PATTI FOR WAB copy

31जानेवारी : मराठा क्रांती मोर्चाकडून आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येतंय. राज्यभर ठिकठिकाणी रास्तारोको सुरू आहे. त्याचे पडसाद सगळीकडे उमटतायत.

- नागपूर मुंबई महामार्ग जाम,असंख्य आंदोलकांनी आकाशवाणी चौकात मानवी साखळी करत केला चक्काजाम

- मुंबई-ठाणे वाहतूक पूर्णपणे  बंद

- औरंगाबाद रास्ता रोकोवर लाठीचार्ज,अनेक कार्यकर्ते ताब्यात

- धुळे मुंबई आग्रा महामार्गावर चक्का जाम. मुंबई आग्रा महार्गावरील वाहतुक विस्कळीत

- दहिसर टोल नाका येथे मराठा आंदोलन सुरू . 500 ते 600 लोक आंदोलनात सहभागी झाले.  पश्चिम द्रुतगति मार्ग मुंबई  आणि  ठाणे या ठिकाणी जाणाऱ्या मोठ्या प्रमाणत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.  कांदिवली पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत .

- ठाण्यातील आनंद नगर चेक नाक्यावर चक्का जाम आंदोलन सुरू आहे.100हून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

- दादरमध्ये टीटीजवळ थोड्याच वेळापूर्वी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.सगळे कार्यकर्ते आता चित्रा टॉकीज जवळ पोहोचले आहेत.

- पनवेलमधील कामोठेजवळही मराठा संघटनेकडून चक्क जाम आंदोलन सुरू आहे.सायन पनवेल महामार्गावर वाहनं अडवली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम होतोय.

- नाशिकलाही मराठा समाज चक्का जाम आंदोलन सुरू आहे. आडगाव नाका भागात मोठी गर्दी उसळलीय. नाशिक - मुंबई हायवे जाम झालाय.

-नगर मनमाड महामार्गही अडवलाय. कोल्हार येथे मराठा समाजाचा रास्तारोको सुरू आहे. शिर्डी शिंगणापूर इथली वाहतुक विस्कळीत झालीय. कोल्हार भगवती येथे महामार्ग अडवलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: January 31, 2017, 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading